फलटण चौफेर दि २५ नोव्हेंबर २०२४ निवडणुक काळात फलटण कोरेगाव मधील जनतेला दिलेल्या आश्वासनामधील सर्व विकासकामांची पूर्तता करणारा असून विशेष प्रयत्नातून फलटण कोरेगाव साठी भरीव निधीची तरतूद आगामी काळात करून फलटणमधील प्रत्येक विकासकाम मार्गी लावण्याची ग्वाही ना अजितदादा पवार यांनी दिली फलटण कोरेगावचे नवनिर्वाचित आमदार सचिन पाटील , माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, पंचायत समितीचे माजी संचालक धनंजय साळुंखे पाटील यांनी नामदार अजित दादा पवार यांची मुंबई येथील देवगिरी या निवासस्थानी भेट घेतली यावेळी दिली दरम्यान,फलटण कोरेगावच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कटिबद्ध असल्याची ग्वाही देत नवनिर्वाचित आमदार सचिन पाटील यांचे नामदार अजित दादा पवार यांनी अटी तटीची लढतीत विजयश्री मिळवल्याबद्दल अभिनंदन केले