फलटण चौफेर दि २३ नोव्हेंबर २०२४
महायुतीचे उमेदवार सचिन पाटील यांचा फलटण कोरेगाव मतदार संघामध्ये दणदणीत विजय झाला आहे या विजयाच्या अनुषंगाने त्यांची फलटण शहरातून दुपारी तीन वाजता भव्य मिरवणूक काढण्यात येणार मिरवणुकीची सुरुवात माजी खा रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या 'राजभवन' या निवासस्थानापासून सुरुवात होणार असून त्याची सांगता गजानन चौक येथे सहा वाजता होणार असून या ठिकाणी जाहीर सभा होणार असल्याचे भाजपचे सरचिटणीस जयकुमार शिंदे यांनी सांगितले