Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय फलटण येथील उद्यान कन्यांचे तरडगाव येथे स्वागत

 


फलटण चौफेर दि ३० नोव्हेंबर २०२४     महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी मान्यताप्राप्त व फलटण एज्युकेशन सोसायटीचे श्रीमंत शिवाजी राजे उद्यानविद्या महाविद्यालय फलटण येथील उद्यान कन्यांनी  ग्रामीण जागरूकता कार्यानुभव व कृषी औद्योगिक जोड  २०२४/२५ कार्यक्रमां अंतर्गत उद्यान कन्यांचे तरडगाव येथे मान्यवरांच्या उपस्थित स्वागत करण्यात आले यावेळी प्रशासक आधिकारी बी.बी  भोसले, ग्रामसेवक डी.जे सोनवणे, मंडल अधिकारी आर. एम. खाडे, ग्रामपंचायत सदस्य व तरडगाव ग्रामस्थ उपस्थित होते.  दरम्यान पुढील दहा आठवड्यांमध्ये राबवण्यात येणाऱ्या शेती विषयक प्रात्यक्षिक, गटचर्चा, जनावरांचे लसीकरण, रक्तदान शिबिर, शेतकरी शास्त्रज्ञ चर्चा, मृदा दिन, इ. कार्यक्रमाविषयी उद्यान कन्यांकडू माहिती देण्यात येईल. तसेच शेतकऱ्यांचे अनुभव त्यांच्या पद्धतीचा सखोल अभ्यास करणार आहेत. हे कार्यक्रम यशस्वीरित्या राबवण्यासाठी आपले सहकार्य व मार्गदर्शन मिळावे अशी  विनंती उपस्थितीना केल्यानंतर सर्वांनी अनुमती दिली. श्रीमंत शिवाजी राजे उद्यान विद्या महाविद्यालय फलटणचे प्राचार्य डॉ.एस.डी.निंबाळकर, कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यु. डी. चव्हाण, कार्यक्रम अधिकारी डॉ. ए.आर.पाटील, डॉ. जे.व्ही.लेंभे व प्रा.ए.डी.पाटील  यांच्या मार्गदर्शनाखाली उद्यान कन्या मदने वैष्णवी, सोनवलकर दिपाली,ननावरे शिवांजली,जगताप सलोनी व कांबळे सुरभी ह्या पुढील कार्यक्रम राबवणार आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.