फलटण चौफेर दि ३० नोव्हेंबर २०२४ : फलटण-कोरेगाव विधानसभा निवडणुकीत सत्ता अबाधित ठेवण्यात अपयशी ठरल्याच्या पार्श्वभूमीवर फलटण येथील अनंत मंगल कार्यालयात राजे गटाचा कार्यकर्त्यांशी संवाद मेळावा पार पडला. विकासकामांच्या मार्केटिंगमध्ये आपण कमी पडलो असल्याची कबुली या मेळाव्यात प्रमुख वक्त्यांनी बोलून दाखविली, अशी माहिती मिळत आहे.मेळाव्यादरम्यान कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी, आपण मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर विकासकामे केली. पण ती लोकांमध्ये पोहोचविण्यात कमी पडलो, असे कबूल केले असल्याची चर्चा पाहायला मिळाली.सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी आपण केलेली विकासकामे मतदारांपर्यंत पोहोचविण्यात कमी पडलो, असे सांगत सरकारची लाडकी बहीण योजना, शेतकरी वीज बिल माफी याचा सुद्धा फटका आपल्याला बसला असल्याचे स्पष्ट केले. तर होते.माजी आमदार दीपक चव्हाण यांनीही आपण केलेली कामे लोकांच्या निदर्शनास आणून देण्यात कमी पडलो हे सांगताना आपण विकासकामांचा डोंगर उभा केला; परंतु ती लोकांपर्यंत पोहोचविण्यात आपण अयशस्वी झालो, असे सांगितले असल्याचे समजत आहे.श्रीराम साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. बाळासाहेब शेंडे, शंभू खलाटे यांनीही उपस्थितांशी संवाद साधला. यावेळी फलटण तालुक्यातून कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित