फलटण चौफेर दि १८ नोव्हेंबर २०२४ फरांदवाडी ता फलटण येथील मयुरेश्वर मंगल कार्यालयाच्या वधु पक्ष खोलीतून दि १७ रोजी दुपारी २.३० वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्याने सुमारे २ लाख ५० हजाराचे रोख रक्कम,मोबाईल, सोन्याचे दागिने लंपास केल्याची धक्कादायक घटना घडली आहे याबाबत विमल संपत कर्णे मुळ रा.आंदरुड ता.फलटण सध्या रा.विरचंद निवास शिवडी मुंबई यांनी फलटण शहर पोलीस स्थानकात फिर्याद दिली असून पुढील तपास म पो हवा फाळके करीत आहेत