विडणी(योगेश निकाळजे) - फलटण तालुक्यातील राजकीय भाकरी ही करपून त्याची पूर्ण राखरांगोळीझाली असून आता ती फेकूनच घायची वेळ आली असून पाण्याविना मासा जसा जगू शकत नाही तसा सत्तेशिवाय श्रीमंत रामराजे राहू शकत नाही म्हणून त्यांची अवस्था झाली असून त्यांची अर्धी निष्ठा शरद पवारांकडे तर अर्धी निष्ठा अजित पवांराकडे असल्याची टिका आ.जयकुमार गोरे यांनी केली आहे.
फलटण -कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार सचिन कांबळे पाटील यांच्या प्रचारार्थ विडणी ता.फलटण येथील आयोजीत जाहीर सभेत आ. जयकुमार गोरे बोलत होते यावेळी माजी खा. रणजितसिंह ना.निंबाळकर, प्रल्हादराव सांळूखे पाटील, शिवरूपराजे खर्डेकर, सुशांत निंबाळकर,माजी सनदी अधिकारी विश्वासराव भोसले, सरपंच सागर अभंग इत्यादी मान्यवर उपस्थित होते
आपण गेल्या १५ वर्षातच माण खटावचा भाग सुजलम सुफलम केला आहे विडणीत गेल्या दीड वर्षात मा.खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून सुमारे ७० कोटी रुपयांची कामे झाली आहेत मात्र फलटणच्या श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी आपल्या २५ वर्षाच्या कारकीर्दीत कोणताही विकास न करता तालुक्यातील जनतेवर हुकमशाही लादली असून आता तालुक्याची सत्ता बदलण्याची वेळ आली असून जनता महायुतीचे उमेदवार सचिन पाटील यांनाच फलटणचा आमदार करणार असल्याचा विश्वासही आ.जयकुमार गोरे व्यक्त केला.
श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर हे कमिन्स कंपनीतील कामगारांच्या पगारामधील वर्षाला ते सुमारे १४४कोटी रुपये कमिशन खात असून हाच काळ पैसा आता ते निवडणूकीत वापरत असल्याची टिकाही आ. गोरे यांनी यावेळी केली ते पुढे म्हणाले फलटणचे आमदार दिपकराव चव्हाण हे गेली १५ वर्षे केवळ नामधारीच आमदार असून त्यांना स्वतःचे निर्णय घेण्याचा अधिकारही नसून त्यांना स्वतःच लेटरपॅड व संपर्क कार्यालयही नाही असा आमदार तालुक्याचा विकास करूच शकत नाही म्हणून हा आमदार आता बदलण्याची वेळ आली असल्याचेही गोरे यांनी सांगितले,
माजी खा रणजितसिंह ना.निंबाळकर म्हणाले की आपण खासदार असताना अनेक मोठमोठी विकासकामे फलटण तालुक्यात आणली मात्र फलटणच्या विकासकामे करताना शरद पवार यांनी आपल्याला विरोध केला होता मात्र अजित पवार यांनी आपल्याला त्यावेळीही अनेकदा मदत केली.श्रीमंत रामराजे यांनी गेल्या २५ वर्षात तालुका भकास केला असून आता परिवर्तन होणे आवश्यक आहे यासाठी उमेदवार सचिन पाटील यांना भरघोस मताने निवडून फलटणची सत्ता उलथून टाका असे आवाहनही यावेळी त्यांनी केले.
सरपंच सागर अभंग म्हणाले की गेल्या दीड वर्षात माजी खा. रणजितसिंह निंबाळकर आ.जयकुमार गोरे यांच्या माध्यामातून विडणीत सुमारे ७० कोटींची विकासकामे झाली आहेत मात्र विरोधक प्रत्येक कामास विरोधच करत असून गावातील अनेक विकास कामे होत नसल्याने करोडो रुपयांचा निधी तसाच पडून आहे यामुळे गावाचे नुकसान होत आहे.सध्या महायुतीचे उमेदवार सचिन पाटील यांना विडणी गावातून भरघोस मताधिक्य मिळणार असून फलटणचे भावी आमदार हे सचिन पाटीलच असणार असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. यावेळी शिवरूपराजे खर्डेकर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमास फलटण तालुक्यातील राष्ट्रवादी भाजप शिंदे गटाचे विविध पदाधिकारी कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.