फलटण चौफेर दि १८ नोव्हेंबर २०२४
सांगवी ता फलटण गावातील दशरथ दुर्गा सावंत (वय ७५) व त्यांच्या पत्नी रतन दशरथ सावंत (वय ६८) हे वृद्ध दाम्पत्य दि १७ रोजी सकाळी १० वाजता राहत्या घरात मृत अवस्थेत आढळल्याची दुर्दैवी घटना घडली याबाबतची फिर्याद मुलगा विक्रम सावंत यांनी फलटण ग्रामीण पोलीस स्थानकात दिली असून तिथून मिळालेल्या माहितीनुसार, दि १७ रोजी सकाळी १० वाजण्याचा सुमारास फिर्यादी यांच्या शेजारी राहत असलेल्या मावस भावाच्या पत्नी या त्यांच्या आईचे मावशीशी फोनवरुन बोलणे करुन देण्यासाठी आल्या होत्या त्यांनी आईवडील राहत असलेल्या खोलीचा दरवाजा बराच वेळ वाजवून देखिल न उघडल्यामुळे जोराचा धक्का देऊन ढकलला असता दरवाजा किंचित उघडल्यानंतर घरातील गॅस शेगडीजवळील कापड जळालेले व घरामध्ये सर्वत्र धुर पसरलेला दिसला व आई गॅसशेगडी शेजारील देव्हा-या जवळ आणि वडील खोलीच्या मुख्य दरवाजाजवळ निपचित पडलेले दिसले परंतु दोघांच्या अंगावरील कपडे मात्र जळालेले नव्हते या घटनेची माहिती मिळताच फलटणचे उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस व फलटण ग्रामीणचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी घटनास्थळी धाव घेतली दरम्यान दोघेही झोपलेल्या खोलीत गॅस शेजारी जळालेले नायलॉन कापड आढळल्याने दोघांचा मृत्यू धुराने गुदमरून झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले असून व्हिसेरा फॉरेन्सिक लॅब पुणे येथे पाठवला आहे त्याचा अहवाल आल्यानंतर दोघांचा मृत्यू नेमका कशाने झाला हे समजणार असल्याचे पो नि सुनील महाडिक यांनी सांगितले