फलटण चौफेर दि १४ बरड ता. फलटण गावचे हददीत पालखी तळाचे मैदानावर जातिवाचक शिवीगाळ करून तलवारीने हल्ला केल्याप्रकरणी तिघांवर फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी दोघांना अटक केली आहे संशयित कुणाल बंडु मदने, सौरभ राजेंद्र लोंढे दोन्ही रा. बरड ता. फलटण अशी अटक केलेल्यांची नावे असून याबाबत फलटण ग्रामीण पोलीस स्थानकातून मिळालेल्या अधिक माहिती अशी,
फिर्यादी सुरज लोंढे व त्याचा चुलत भाऊ कार्तिक लोंढे व त्यांचा मित्र प्रथमेश बागाव हे व्यायाम करुन घरी जात असतांना कुणाल मदने, सौरभ लोंढे, पांडा मसुगडे(पूर्ण नाव माहीत नाही) यांनी शिवीगाळ करून लोखंडी तलवारीने वार करून जखमी केल्याचे म्हटले आहे घटनेनंतर संशयित फरारी झाले होते. पोलिसांनी संशयतांना दुधेबावी ता. फलटण गावचे हददीतील डोंगरातून अटक केली आहे. सदर कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल दस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनील महाडीक डीबीचे गोपाल बदने पोउनि, शिवाजी जायपत्रे सपोनि, पोलिस हवा. नितिन चतुरे, पोहवा. सचिन भोसले, पोना. अमोल जगदाळे, श्रीनाथ कदम, दत्ता नाले, पोकॉ. हनुमंत दादस, सपोफौ. संतोष मठपती, पोना. सागर अभंग, यांनी केली. गुन्ह्याचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस करीत आहेत.