फलटण चौफेर दि १५
गत लोकसभा निवडणुकीत माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना सुरवडीतून भरघोस असे मताधिक्य दिले होते त्याच प्रमाणे उद्याच्या विधानसभा निवडणुकीत सुद्धा महायुतीचे अधिकृत उमेदवार सचिन कांबळे पाटील यांना सुरवडी गावातून उच्चांकी मताधिक्य देणार आहे महायुतीच्या माध्यमातून राज्यभरात भरघोस विकास कामे झाली आहेत त्याचप्रमाणे फलटण तालुक्याचा मागील पंधरा वर्षाच्या विकासाचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी सर्वांनी सचिन कांबळे पाटील यांच्या विजयासाठी अहोरात्र कष्ट घेण्याचे आवाहन सुरवडी येथील निसर्ग हॉटेल वर आयोजित गावातील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत केले यावेळी महायुतीचे उमेदवार सचिन कांबळे पाटील, सुरवडीच्या सरपंच शरयू साळुंखे पाटील, उपसरपंच विजय खवळे, विकास सोसायटीचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, आजी माजी ग्रामपंचायत सदस्य, सोसायटीचे संचालक, महिला व युवक बहुसंख्येने उपस्थित होते