फलटण चौफेर दि २६ 'मी मतदानाचा हक्क बजावणार' स्वाक्षरी मोहिमेचा निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी सचिन ढोले यांच्या हस्ते आज दिनांक २६ रोजी ११ वाजता सजाई गार्डन फलटण या ठिकाणी शुभारंभ करण्यात आला स्वाक्षरी मोहिमेचा स्वाक्षरी करून शुभारंभ करण्यात आला यावेळी नोडल अधिकारी स्वीप सचिन जाधव उपस्थित होते यावेळी केंद्राध्यक्ष मतदान अधिकारी १ व २ तसेच इतरअधिकारी व कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी फलटण सचिन ढोले यांनी यावेळी मतदारानी २० नोव्हेंबर रोजी मतदान हक्क बाजवण्यासाठी घरा बाहेर पडून मतदान करण्याचे आवाहन केले स्वाक्षरी मोहीम फलक फलटण शहरातील गर्दीच्या असणाऱ्या ठिकाणी ठेवण्यात येऊन मतदारा मध्ये मतदान जनजागृतीचा अनोखा उपक्रमद्वारे राबविण्यात येत आहेयावेळी 'आपले मत आपले भविष्य', 'मतदार राजा जागा हो लोकशाही चा धागा हो' अशी घोषवाक्य देण्यात आली