श्रीदत्त इंडिया कारखान्याने दुसरा हप्ता द्यावा- ऊस उत्पादक शेतकरी
साखरवाडीची वार्ताOctober 25, 2024
0
फलटण चौफेर दि २६ साखरवाडी तालुका फलटण येथील श्री दत्त इंडिया प्रायव्हेट लिमिटेड साखर कारखान्याने सन २०२३/२४ हंगामामध्ये गाळपास आलेल्या उसाला प्रति टन ३०० रुपये प्रमाणे दुसरा हप्ता देण्याची मागणी फलटण तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी कंपनीचे संचालक जितेंद्र धारू यांना निवेदनाद्वारे केली आहे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, श्रीदत्त इंडिया कारखान्याने गळीत हंगाम २०२३/२४ मध्ये गाळपास आलेल्या ऊसाला प्रति टन ३१०० प्रमाणे ऊस बिल अदा केले आहे मात्र लगतच्या सोमेश्वर व माळेगाव कारखान्याचे ऊस दर पाहता आगामी दिवाळी सणाच्या तोंडावर शेतकऱ्यांना दुसरा हप्ता म्हणून ३०० रुपये प्रति टनाप्रमाणे देऊन शेतकऱ्यांची दिवाळी गोड करावी यावेळी कारखान्याचे प्रशासकीय अधिकारी अजितराव जगताप, पं स चे माजी सभापती शंकरराव माडकर, फलटण तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सतीश माने, मजूर फेडरेशनचे संचालक अंकुश साळुंखे पाटील ,के के भोसले,जे के भोसले, रमेश बोंद्रे, भाऊसाहेब भोसले, माऊली भोसले, अभयसिंहराजे नाईक निंबाळकर, संजय भोसले, रामचंद्र भोसले, गोरख पवार, रवींद्र टिळेकर, दिलीप बाबा पवार, बाळासो भोसले (वारकरी) पै ओंकार भोसले, हेमंत भोसले, राजेंद्र गाडे, अमर भोसले, विक्रम घाटगे,विकास तांबे, प्रकाश पवार, काशिनाथ जगताप, बाळासो भोसले, योगेश माडकर, लालासो ठोंबरे व शेतकरी उपस्थित होते