फलटण चौफेर दि २७ पाडळी सातारा रोड येथील राहणारे संशयित हरी धोंडीराम शिरतोडे व त्याची पत्नी सौ. अंकीता हरी शिरतोडे यांनी तिरुपती डेव्हलपर्स नावाची कंपनी व तिरुपती पतसंस्था करंजे सातारा येथे स्थापन करुन लोकांना मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून त्यांचेकडून मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करुन त्यांची फसवणूक केली असून त्याबाबत शाहुपूरी पोलीस ठाणे येथे २० ते २५ लोकांच्या तक्रारीवरून फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सातारा शहर व जिल्हयातील तसेच इतर जिल्हयातील लोकांचेकडून हरी धोंडीराम शिरतोडे व अंकीता हरी शिरतोडे यांनी तिरुपती डेव्हलपर्स व तिरुपती पतसंस्था यामध्ये गुंतवणूक करण्यास भाग पाडून कोणाची फसवणूक केली असल्यास त्यांनी शाहुपूरी पोलीस ठाणे सातारा येथे संपर्क साधण्याचे आवाहन शाहूपुरी पोलिसांकडून करण्यात आले आहे
दुरध्वनी क्रमांक - 02162-252333
मोबाईल क्रमांक 8412042624