साखरवाडी पुढारी वृत्तसेवा साखरवाडी ता फलटण येथील श्रीदत्त इंडिया साखर कारखान्याच्या कामगारांना यावर्षी दिवाळी बोनस २० टक्के व कामगारांना १० किलो मोफत साखर देणार असल्याचे कंपनीचे प्रशासकीय अधिकारी अजितराव जगताप यांनी सांगितले विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमंत आ रामराजे नाईक निंबाळकर व कंपनीचे संचालक जितेंद्र धारू व फलटण तालुका साखर कामगार युनियन यांच्यात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला व आज दिनांक २२ रोजी कामगारांच्या बँक खात्यावर बोनस रक्कम जमा करण्यात आली असल्याचे अजितराव जगताप यांनी सांगितले फलटण तालुका साखर कामगार युनियनच्या वतीने श्री दत्त इंडिया प्रशासन ,श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर कंपनीचे संचालक जितेंद्र धारु यांचे कामगारांच्या वतीने आभार मानण्यात आले. यावेळी फलटण तालुका साखर कामगार युनियनचे सेक्रेटरी राजेंद्र भोसले, उपाध्यक्ष बाळासाहेब भोसले, गोरख भोसले,सुहास गायकवाड, पै संतोष भोसले, संजय जाधव, ग्रामपंचायत सदस्य मच्छिंद्र भोसले,एच आर विराज जोशी उपस्थित होते.