फलटण चौफेर दि २२
वाई गुन्हेप्रकटीकरण विभागाकडुन चोरीस गेलेल्या सुमारे ३ लाख ५० हजार रुपये किंमतीच्या ५ मोटारसायकल हस्तगत वाहनचोरीचे ५ गुन्हे उघड करण्यात पोलिसांना यश आले असून पोलिसांनी संशयित गणेश धनराज पिल्ले रा कोंढावळे ता. वाई जि. सातारा याला ताब्यात घेतले आहे या बाबत वाई पोलीस ठाण्यातून मिळालेली अधिक माहिती अशी, पोलीस उपनिरीक्षक सुधीर वाळुंज व वाई गुन्हेप्रकटीकरण शाखेतील अंमलदार हे वाई शहरात गस्त घालत असतांना परखंदी रोड येथे ओढ्याचे कडेला एक संशयित इसम हा विना नंबर प्लेटची गाडी घेऊन फिरतांना दिसल्याने व त्याचा संशय आल्याने त्यास थांबवुन त्याचे ताब्यात असणा-या काळ्या रंगाच्या अॅक्टीव्हा गाडीबाबत विचारणा केली असता तो उडवाउडवीचे उत्तरे देऊ लागला त्यास त्याचे नाव विचारले असता त्याने त्याचे नाव गणेश धनराज पिल्ले रा कोंढावळे ता. वाई जि. सातारा असे असल्याचे सांगितले त्याचेकडे कसुन तपास केला असता, त्याने वाई शहरातुन ५ गाड्या ह्या चोरी केल्याची कबुली दिल्याने सुमारे ३ लाख ५०हजार रुपये किंमतीची ५ वाहने वाई गुन्हेप्रकटीकरण शाखेने आरोपीकडुन हस्तगत करण्यात आलेली आहेत.सदरची कारवाई ही वाई पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक . जितेंद्र शहाणे, तपासपथकाचे पोलीस उपनिरीक्षक सुधीर वाळुंज, पो.कॉ विशाल शिंदे पो.कॉ राम कोळी, पो. कॉ नितीन कदम, पो. कॉ हेमंत शिंदे, पो. कॉ श्रावण राठोड, पो. कॉ रुपेश जाधव, राम कोळेकर यांच्या पथकाने केली आहे. पुढील तपास पोलीस हवालदार १. अरुण पाटणकर २. उमेश गहीण, ३. लेंभे हे करीत आहेत. मा पोलीस अधिक्षक साो श्री समीर शेख व अप्पर पोलीस अधिक्षक श्रीमती वैशाली कडुकर मॅडम यांनी वाई गुन्हेप्रकटीकरण विभागाचे अभिनंदन केले आहे.