Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

दिपकराव चव्हाण यांनी चौथ्यांदा भरला उमेदवारी अर्ज

 




फलटण चौफेर दि २५ 

फलटण-कोरेगांव विधानसभा मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व मित्र पक्ष महाविकास आघाडी कडून फलटण कोरेगाव चे मागील तीन टर्म आमदार असलेले  दिपकराव चव्हाण यांनी आज शक्ती प्रदर्शन करीत तुतारी व हलगीच्या निनादात  निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी सचिन ढोले यांच्याकडे आपला उमेदवारी अर्ज सुपूर्त केला दुपारी ३ वाजता त्यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला याआधी त्यांनी फलटणचे आराध्य दैवत प्रभू श्रीरामाच्या  मंदिरात जाऊन दर्शन घेतले उमेदवारी अर्ज भरल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत  सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर म्हणाले की, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट या पक्षातून महाविकास आघाडी कडून यावेळी आपण आमदार दीपक राव चव्हाण यांचा उमेदवारी अर्ज भरला असून सलग तीन टर्म  त्यांनी  शेतकरी व सर्वसामान्य जनतेला केंद्रबिंदू मानून  केलेली विकास कामे विधानभवनात त्यांनी उपस्थित केलेले प्रश्न व फलटण तालुक्यावर राष्ट्रवादी राजे गटाचे असलेले वर्चस्व याला आता  शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट,राष्ट्रीय काँग्रेस,आप या पक्षांची सुद्धा साथ मिळाली असल्याने  आमदार दीपकराव चव्हाण हे चौथ्यांदा विधान सभेवर निवडून जातील यात शंका नाही


आमदार दीपकराव चव्हाण म्हणाले, पंधरा वर्षाच्या आमदारकीच्या काळात मी केलेली विविध विकास कामे व मागील ३० ते ३५ वर्षापासून श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी मंत्रिपद व सभापती काळात गेलेली विविध विकासकामे व जिल्हा परिषदेच्या माध्यमातून श्रीमंत संजीवराजे यांनी केलेली कामे जोरावर मायबाप जनता मला चौथ्यांदा विधानसभेवर निवडून पाठविल  यात  शंका  नाही समोरचा उमेदवार अजून कुठून लढणार हे निश्चित नसले तरी  समोरचा उमेदवार अजित पवार गट किंवा भाजपमधून  लढला तरी याचा फारसा परिणाम होणार नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले महेंद्र बेडके सूर्यवंशी यांनी  सर्वजण एकत्रित काँग्रेस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आप व राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट एकत्रित लढत असल्याने गत वेळी पेक्षा आमदार दीपकराव चव्हाण यांचा विजय यावेळी अधिक मताधिकांनी होईल असे सांगितले अर्ज भरतेवेळी राष्ट्रवादी राजे गट राष्ट्रीय काँग्रेस शिवसेना उबाठा व आप पक्षाचे बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते 


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.