Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

'तुमच्या सगळ्यांच्या आग्रहामुळे तुतारी हाती आता पुढची जबाबदारी तुमची'- श्रीमंत संजीवराजे




फलटण चौफेर दि २५

 फलटण तालुक्यातील सर्वसामान्य नागरिक, युवक महिला यांनी आपण तुतारी  हाती घेऊन राष्ट्रवादी शरदचंद्र पवार  पक्षात प्रवेश करावा अशी मागणी केली होती ती स्वीकारून आम्ही शरदचंद्र पवार गटात प्रवेश करून तुतारी हाती घेतली आहे आता येणाऱ्या २०  तारखेला साखरवाडी भागातून आमदारकीसाठी सलग चौथ्यांना उभे असलेले दीपकराव चव्हाण यांना विधानसभेत पाठवण्यासाठी तुम्ही एकजूट दाखवावी व तालुक्याची बसलेली विकासात्मक घडी विस्कटू न देता विरोधकांना  दूर ठेवावे.  साखरवाडीत भविष्यात अजून औद्योगिकरण वाढणार असून साखरवाडीच्या मूलभूत गरजा सुद्धा वाढणार आहेत त्या दृष्टीने आपल्याला काम करायचे असून दीपक चव्हाण सलग तीन टर्म आमदार म्हणून निवडून गेले असले तरीही त्यांचे पाय जमिनीवर असून सर्वसामान्यांना केंद्रबिंदू मानून त्यांनी सभागृहात सातारा जिल्ह्यातून सर्वाधिक १६४ प्रश्न विचारले असून त्यामध्ये शेतकरी, कामगार व खंडकऱ्यांच्या  महत्त्वाच्या प्रश्नांचा समावेश आहे त्यांनाच आपण भरघोस मताने विजयी करण्याचे आवाहन श्रीमंत संजीवराजे यांनी साखरवाडीत नेहरू युवा मंडळाच्यावतीने चांदणी चौक येथे आयोजित कोपरा सभेत केले


 यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती शंकरराव माडकर,फलटण तालुका राष्ट्रवादी अध्यक्ष सतीश माने, श्रीरामचे व्हा चेअरमन नितीन शाहूराजे भोसले, फलटण तालुका साखर कामगार युनियनचे राजेंद्र भोसले, गोरख भोसले, पोपट भोसले, होळ विकास सोसायटीचे चेअरमन सुधीर भोसले, माजी चेअरमन चंद्रकांत भोसले, माजी सरपंच सुरेश भोसले जयराम नाना भोसले, के के भोसले, मातोश्री कंट्रक्शनचे संजय भोसले, ग्रा सदस्य मच्छिंद्र भोसले, हरीश गायकवाड,दत्तात्रय वाघ,अभयसिंहराजे नाईक निंबाळकर,संतोष भोसले, हेमंत भोसले, पै संतोष भोसले, शरदराव जाधव,सचिन भोसले,विक्रम घाटगे,शंभू सरगर, योगेश माडकर यांच्यासह राष्ट्रवादी राजे गटाचे कार्यकर्ते उपस्थित होते 


आ दीपक चव्हाण म्हणाले,  तालुक्यात १९९५ सालापासून अपक्ष निवडून आल्यापासून आपल्या सर्वांचे नेते श्रीमंत रामराजे यांनी  औद्योगिक, शैक्षणिक व सामाजिक या सर्वच घटकात काम केले असून सर्वसामान्य केंद्रबिंदू मानून त्यांचा आर्थिकस्तर उंचावण्याच काम केल आहे तालुक्यात  दोन कारखाने, कमिन्स कंपनी येऊ घातलेली ट्यूब इंडिया कंपनी, महिंद्रा लॉजिस्टिक यासारख्या कंपनीमधून हजारो युवक युवतींना रोजगार मिळनार आहे विरोधक म्हणतात रामराजेंनी काय केले?  ही सर्व केलेली कामे जर त्यांना दिसत नसतील तर हे खूप मोठे दुर्दैव आहे साखरवाडी ची बाजारपेठ कारखाना बंद असताना कशी होती व आता कशी आहे याचे आपण साक्षीदार आहात विरोधक जर तुमच्याकडे मते मागायला आले तर त्यांना एवढंच विचारा की तुमचं तालुक्याच्या विकासात काय योगदान आहे साखरवाडीत दि २४ रोजी  राष्ट्रवादी राजेगटाच्या वतीने आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने साखरवाडी, माडकर वस्ती,जिंती, खामगाव, काटकरवस्ती, फुलेनगर या ठिकाणी  दिवसभर कोपरा सभेचे आयोजन करण्यात आले होते याची सांगता नेहरू युवा मंडळ चांदणी चौक या ठिकाणी झालेल्या कोपरा सभेने झाली यावेळी राजेगटाचे बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते




Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.