फलटण चौफेर दि २५ फलटण-कोरेगांव विधानसभा मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व मित्र पक्ष महाविकास आघाडी कडून फलटण कोरेगाव चे मागील तीन टर्म आमदार असलेले दिपकराव चव्हाण आज चौथ्यांदा आपला उमेदवारी अर्ज भरणार असून दुपारी १वाजता फलटण येथील श्रीराम मंदिर येथे हजारोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन राष्ट्रवादी शरदचंद्र पवार राजे गटाच्या वतीने करण्यात आले आहे