फलटण चौफेर दि २४ बिबी ता. फलटण गावचे हद्दीत दि २० रोजी सकाळी बिबी ते आळजापुर रोडने मॉर्निंग वॉक करण्यासाठी जात असलेल्या महिलेला मोटर सायकल वरून आलेल्या तीन इसमांनी गळयातील, कानातील व दोन लेडीज अंगठ्या असे सोन्याचे दागीने बळजबरीने हिसकावुन चोरुन नेल्याची घटना घडली होती लोणंद पोलिसांनी गावातील सी.सी.टी.व्ही. फुटेजच्या आधारे तसेच खब-यामार्फत माहिती घेऊन दोघा सराईत संशयतांना अटक केली अटक केलेल्यांमध्ये रोहीत उर्फ टक्या चिवळ्या पवार वय-२४वर्षे रा.सुरवडी ता.फलटण , आकाश ऊर्फ पप्या ऊर्फ गमज्या टेलरिंग ऊर्फ सुरेश भोसले वय-२७वर्षे रा. येळेवाडी ता. खंडाळा व पायगुण खमखम भोसले वय-४९वर्षे रा हळगाव ता. जामखेड जि.अहमदनगर सध्या रा.सुरवडी ता. फलटणअशी अटक झालेल्या संशयतांची नावे आहेतमी याबाबत लोणंद पोलीस ठाण्याखातून मिळालेले अधिक माहिती अशी, लोणंद पोलीस स्थानकाचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशिल भोसले व गुन्हे प्रकटीकरण शाखेने सी.सी.टी.व्ही. फुटेज मधील अनोळखी इसमांचे ठाव ठिकाण्याबाबत व गुन्हयात वापरलेली मोटार सायकल त्यांचेकडे असल्याची गोपनीय खब-यामार्फत माहिती मिळवून आठ तासात दोन आरोपींना पकडण्यात यश मिळविले. दरम्यान आरोपींनी व त्यांचे नातेवाईकांनी पोलीसांवर दगडफेक करुन हल्ला करुन त्यातील दोन आरोपीं ऊसाचे शेतात पळुन गेले त्यांवेळी आरसीपी टीम सातारा यांचे मदतीने ऊसात लपलेले आरोपी पकडण्यात यश मिळविले. आरोपीना पोलीस ठाणेत घेवुन आलेनंतर त्यांचेकडे अधिक विचारपुस केली असता त्यांनी सदरचा गुन्हा केल्याचे कबुल करुन त्यामधील चोरुन नेलेला २ लाख रुपये किंमतीचा सोन्याचा मुद्देमाल व ७० हजार रुपये किंमतीची गुन्हयात वापरलेली होंडा कंपनीची मोटार सायकल असा एकुण २ लाख ७० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच त्यांनी व त्यांचा आणखी एका साथीदाराने लोणंद व इतर पोलीस ठाणे हद्दीत केलेल्या गुन्हयाची कबुली दिली