फलटण चौफेर दि २५ आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पहिल्या ३७ जागांची यादी जाहीर केल्यानंतर आज राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून सात जागांसाठी उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे त्यामध्ये अणुशक्तीनगर – सना मलिक, वांद्रे पूर्व – झिशान सिद्दीकी,इस्लामपूर – डॉ निशिकांत पाटील,तासगाव-कवठे महांकाळ - संजयकाका पाटील,वडगाव शेरी – सुनील टिंगरे, शिरुर- ज्ञानेश्वर कटके व लोहा - प्रताप चिखलीकर या सात जागांचा समावेश आहे