फलटण चौफेर दि २८ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे फलटण कोरेगाव राखीव मतदार संघातून सचिन सुधाकर कांबळे पाटील यांनी शक्ती प्रदर्शन करीत आज मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी सचिन ढोले यांच्याकडे आपला उमेदवारी अर्ज भरला महायुतीमध्ये फलटण विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी अजित पवार पक्षाकडे गेल्याने मूळचे भाजपचे असलेले सचिन कांबळे पाटील यांनी काल बारामती येथे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता भाजपचे सचिन कांबळे पाटील यांनी प्रवेश केला होता त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे सचिन कांबळे पाटील घड्याळ चिन्हावर निवडणूक लढविणार असून आज सकाळी सकाळी ११ वाजता छत्रपती शिवाजीमहाराज पुतळ्याला अभिवादन करून शक्तिप्रदर्शन करीत त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी माजी खा रणजितसिंह नाईक निंबाळकर, राज्यसभा खा नितीन पाटील, फलटण तालुक्याचे ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे पाटील,जिल्हा बँकेचे संचालक शिवरुपराजे खर्डेकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब भाजपचे जिल्हा सरचिटणीस जयकुमार शिंदे, डी के पवार व महायुतीतील सर्व प्रमुख पदाधिकारी पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते