फलटण चौफेर दि ८
जनावरांची कत्तल करून वाहतूक करणाऱ्या फलटण शहरातील मंगळवार पेठेमधील संशयित तौफिक इम्तियाज कुरेशी, वय २३ वर्षे, इलाही हुसेन कुरेशी, वय २५ वर्षे, अरबाज इम्तियाज कुरेशी, यच २८ वर्षे, व इनायत हुसेन कुरेशी, बब २७ वर्षे, सर्व रा. कुरेशीनगर, मंगळवार पेठ, फलटण, जि. सातारा यांना
सातारा जिल्हा पोलीस प्रमुख समीर शेख यांनी सातारा जिल्ह्यातून दोन वर्षाकरिता तडीपार केले आहे संशयतांनी कत्तलीसाठी मनाई असताना गोवंशीय जनावरांची कत्तलीसाठी वाहतुक करताना मिळुन आल्यामुळे त्यांचेवर गुन्हे दाखल असल्याने फलटण ग्रामीण पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी सुनिल महाडीक, फलटण ग्रामीण पोलीस ठाणे यांनी सदर टोळीविरुध्द्र महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५ प्रमाणे पूर्ण सातारा जिल्हा हद्दीतुन दोन वर्षे तडीपार करणेबाबतचा प्रस्ताव हद्दपार प्राधिकरण तथा पोलीस अधीक्षक सातारा यांचेकडे पाठवला होता त्यास पोलीस प्रमुखांनी मंजुरी दिली असून संशयतांना सातारा जिल्ह्यातून दोन वर्ष तडीपार केले असल्याची माहिती फलटण ग्रामीणचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी दिली