फलटण चौफेर दि. ९ : फलटण येथे आज छत्रपती संभाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे भूमिपूजन सकाळी १० वाजता खा. श्री. छ. उदयनराजे भोसले व आ. श्री. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते समारंभपूर्वक करण्यात येणार असून समारंभाचे अध्यक्षस्थान महाराष्ट्र विधानपरिषदेचे माजी सभापती आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर भूषविणार असल्याची माहिती आ. दीपक चव्हाण व सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी दिली तसेच छ. शिवाजी महाराज चौक येथे भूमिपूजन याच मान्यवरांच्या हस्ते होणार असल्याचे आ. दीपक चव्हाण व श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी सांगितले. या कार्यक्रमात फलटण शहर व तालुक्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी केले आहे.या कार्यक्रमाला आ. बाळासाहेब पाटील, खा. नितीन पाटील, आ. मकरंद पाटील, आ. शशिकांत शिंदे, सत्यजितसिंह पाटणकर, युवराज श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर, फलटण पंचायत समितीचे माजी सभापती श्रीमंत विश्वजितराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत सत्यजितराजे नाईक निंबाळकर उपस्थित राहणार आहेत.