फलटण चौफेर दि १ आरोग्य विभागामध्ये भरती करतो म्हणून चार लाख रुपये घेऊन त्यापैकी ७० हजार माघारी देऊन उर्वरित पैशाची फसवणूक केल्याची घटना घडली आहे याबाबत फलटण ग्रामीण पोलीस स्थानकात संशयित सचिन महादेव शिंदे रा साठे फाटा तालुका फलटण याच्यावर गुन्हा दाखल झाला असून फलटण ग्रामीण पोलीस स्थानकातून मिळालेली अधिक माहिती अशी, फिर्यादी शिवदास राजाराम इंगळे वय ३५ रा गांगलवाडी ता मालेगाव जिल्हा वाशिम सध्या राहणार साई स्वरा अपार्टमेंट बिदाल रोड दहिवडी यांची संशयित सचिन महादेव शिंदे यांनी आरोग्य विभागात भरती करतो म्हणून दि १ ऑगस्ट २०२१ ते ३ नोव्हेंबर २०२१ दरम्यान एकूण ४ लाख रुपये घेऊन भरती न करता चार लाखापैकी ७० हजार परत देऊन उर्ववरित पैशाचा अपहार करून फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे पुढील तपास पो ना आडके करीत आहेत