गोखळी (प्रतिनिधी). महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे आयोजित २०२३ शिक्षकांसाठी दर्जेदार व्हिडिओ निर्मिती स्पर्धा आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला.या स्पर्धेत गोखळी गावचे सुपुत्र सध्या विद्या प्रतिष्ठान मराठी माध्यमिक शाळा बारामती येथे सेवेत असलेले उपक्रमशिल शिक्षक सचिन भगवान चव्हाण यांचा तालुका स्तरावर ३ री ते ५ वी (इंग्रजी) या गटात प्रथम व ६ वी ते ८ वी (भाषा) या गटात द्वितीय क्रमांक मिळवून यश संपादन केले.शाळेचे मुख्याध्यापक यादव पी.आर. ,उपमुख्याध्यापक शकोरे पी एम ,पर्यवेक्षक , रकटे एन बी ,.गोसावी.एच आर तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी कौतुक केले.