फलटण चौफेर दि १ जिंती नाका फलटण येथे दि ३० रोजी आयशर गाडी क्र. एम एच ०३ सीपी-९०२४ या टेम्पो मध्ये अन्न पाण्याची कोणतीही सोय न करता आयशर गाडीचा चालक इरफान अत्तार कागदी, रा.कोरेगाव, ता. कोरेगाव, जि.सातारा याने सोळा म्हैशी कत्तल करण्याचे हेतुने वाहनामध्ये क्रुरपणे डांबून त्यांची चारा पाण्याची कोणतीही सोय न करता विना परवाना वाहतूक करीत असताना फलटण पोलिसांनी त्यास वरील प्राण्यांसह पकडले असून त्याच्या विरुद्ध प्राण्याचा छळ प्रतिबंधक अधिनियम कायद्या नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे फलटण शहर पोलिस स्टेशनकडून मिळालेल्या माहिती नुसार जिंती नाका फलटण येथे ४ लाख रुपयेचा आयशर टेम्पो व त्यात अतिशय क्रूर पणे कोंबलेल्या एकूण सोळा म्हैशी ज्यांची किंमत अंदाजे अडीच लाख असा एकूण साडेसहा लाख रुपयांचा मुद्देमाल पकडला आहे अवधुत गोरख धुमाळ, वय-२७ वर्षे, रा-तरडगाव, ता.फलटण यांनी फलटण पोलिस स्टेशन मध्ये वरील तक्रार दाखल केली असून पो हवा सचिन फाळके अधिक तपास करीत आहेत