Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

सासकलचे कृषी सहाय्यक सचिन जाधव राज्यपालांच्याहस्ते कृषी सेवारत्न पुरस्काराने सन्मानित

 


फलटण चौफेर दि ३० महाराष्ट्र शासनाचा पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील कृषी सेवा रत्न पुरस्कार  सासकल ता फलटण कृषी सहाय्यक सचिन जाधव यांचा राज्याचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन  यांच्या हस्ते सन्मान पत्र देऊन गौरव करण्यात आला यावेळी उपमुख्यमंत्री अजित दादा पवार व कृषिमंत्री धनंजय मुंडे , प्रधान सचिव जयश्री भोज भा.प्र.से, आयुक्त कृषी रवींद्र बनवडे भा.प्र.से  कैलास मोते, फलोत्पादन  संचालक महाराष्ट्र राज्य, विनयकुमार आवटे, विकास पाटील, सुनील बोरकर,आणि अंकुश माने सहसंचालक या मान्यवरांच्या उपस्थित मध्ये नॅशनल स्पोर्ट्स क्लब  वरळी मुंबई गौरव करण्यात आला सचिन जाधव यांनी सातारा जिल्यातील पाहिला कृषि सेवा रत्न मिळवण्याचा मान मिळवला आहे  महाराष्ट्र शासनाचा सर्वोच्च पुरस्कार म्हणून      कृषि विभागा कडून दिला जाणरा हा पुरस्कार आहे 

या पुरस्कारा बद्दल  उमेश पाटील विभागीय कृषी सहसंचालक कोल्हापूर विभाग कोल्हापूर, जिल्हा आधीक्षक कृषि अधिकारी सातारा भाग्यश्री फरांदे,उपविभागीय कृषि अधिकारी फलटण, सुहास रनसिंग तालुका कृषि अधिकारी फलटण, दत्तात्रय गायकवाड, मंडळ कृषि अधिकारी विडणी शहाजी शिंदे, कृषि पर्यवेक्षक अजित सोनवलकर तसेच कृषी पर्यवेक्षक  संघटना,कृषी सहाय्यक संघटनानी अभिनंदन केले

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.