फलटण चौफेर दि ९ महाबळेश्वर येथील हॉटेल व्यवसायिकाची मद्य विक्रीचा परवाना मिळवून देतो असे सांगून एक कोटी पाच लाख रुपयाची फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हे अन्वेषण विभाग (पुणे) येथे नेमणुकीस असलेल्या अपर पोलीस अधीक्षकास अटक करण्यात आली आहे. त्यास पाच दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे. श्रीकांत नामदेवराव कोल्हापूरे(वय ५७ सध्या रा पुणे मूळ रा कोल्हापूर) अटक केलेल्या संशयीताचे नाव आहे. गुन्हे अन्वेषण विभाग सीआयडी), कोल्हापूर यांचेकडील तपासास असलेल्या प्रकरणाचा वाई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. महाबळेश्वर येथील मेघदुत हॉटेलचे मालक यांना मद्य विक्री परवाना मिळवून देतो असे सांगुन आरोपी श्रीकांत कोल्हापूरे याचे मित्र हानुमंत मुंढे व इतर साथीदारांच्या मदतीने हॉटेल मालक यांचा विश्वास संपादन करून दोन कोटी पन्नास लाख रुपये खर्च येणार असे सांगितले व त्यांचेकडून एक कोटी पाच लाख रुपये रोखीने व चेकव्दारे घेवुन हॉटेल मालक याची फसवणुक केली आहे.