Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

सोशल मीडिया माध्यमातून " माय लेकराची भेट "

                              



    गोखळी( प्रतिनिधी)   फलटण परीसरात बेघर बेवारस स्थितीत एक ६५-७० वर्षाच्या आजी  ऊन पाऊसात भटकताना तालुका भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष पै.बजरंग गावडे, धनंजय ढमाळ यांना आढळून आले असता त्यांनी गोखळी मनोबल आसरा फाउंडेशन टिमचे राजु गावडे पाटील यांना मोबाईल वरून संपर्क साधात संबंधित आजीची माहिती दिली.मनोबल आसरा फाउंडेशन टिमचे श्री राजु गावडे पाटील आणि श्री हणमंत खलाटे यांनी तातडीने हालचाल करत आजी पर्यंत पोहचले. संबंधित आजीची माहिती घेतली असता आपले नाव लतिका आणि राहणार महंमदवाडी (पुणे) आहे असे सांगितले आजींना त्वरित फलटण शहर पोलिस स्टेशन जावून कॉन्स्टेबल धायगुडे आणि लोंढे यांचे सहकार्याने मराठा लाईफ फाउंडेशन संचलित आई वृध्दाश्रमाचे व्यवस्थापक अध्यक्ष देवीदास लोखंडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी मदतीचे आश्वासन दिले नंतर त्या बेघर बेवारस आजींना संस्थेत दाखल केल.सदर नाव लता मेघराज आल्हाट रा.   महंमदवाडी (पुणे ) पंढरपूर रोडवर( फलटण) सापडल्यानंतर " आई अनाथ आश्रम मलटण येथे दाखल करण्यात आलेल्या.  घटनेचा व्हिडिओ दहा बारा दिवस सोशल मीडिया फिरत असताना तो संबंधित आजींच्या नातेवाईकांना पहाण्यात आला हरवलेल्या आजी दुसऱ्या तिसऱ्या कोण नसून आपलीच आई असावी म्हणून तातडीने आजीचा मुलगा,सून यांनी फलटण गाठले त्यांनी सांगितले कि आई तीन महिन्यापूर्वी घरातून निघून गेल्या होत्या आम्ही खूप शोध घेतला परंतु सापडले नाहीत. 

मनोबल आसरा फाउंडेशन टिमशी संपर्क साधत आपली आईच असल्याचे मुलगा मयूर मेघराज आल्हाट, मुलगी,सुन यांच्या कडे खात्री करून आजींना ताब्यात दिले.आजीच्या मुलगा सून मुलगी टिमचे मनापासून आभार मानले

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.