फलटण चौफेर दि ९ फलटण कोरेगाव विधानसभा मतदार संघाची निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या माध्यमातून लढवण्याचे मी ठरवले आहे. त्यासाठी पक्षाकडे उमेदवारीची मागणीही केली असल्याची माहिती उद्योजक बुवासाहेब हुंबरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.यावेळी हुंबरे म्हणाले, मी मुरूम ता फलटण तालुक्याचा भूमिपुत्र असून तालुक्यातील विविध समस्यांची जाणीव मला आहे. मतदारसंघातील युवक, शेतकरी, महिला यांचे प्रश्न सोडवण्यासाठी, सहकार वाचवण्यासाठी ही निवडणूक लढवणार आहे. खा. शरद पवार यांच्या सूचनेनुसार मी तालुका दौरा केला आहे. लोकांच्या समस्या जाणून घेत आहे. फलटण तालुक्यात रोजगार निर्माण झाले पाहिजेत. तरुणांना रोजगारासाठी अन्य शहरात जावे लागू नये यासाठी फलटणला आयटी कंपन्या आणण्याची गरज आहे. विकास व रोजगाराचे माझे व्हिजन तयार आहे. मला लोकांचं नेतृत्व नाही तर प्रतिनिधित्व करायचं आहे. जनतेचा मला प्रतिसाद मिळत असून कोणत्याही परिस्थितीत २०२४ ची निवडणूक मी ताकदीने लढवणार असल्याचे ते यावेळी म्हणाले.