फलटण चौफेर दि ६
नीरा खोऱ्यातील पाणलोट क्षेत्रात पुन्हा पावसाला सुरवात झाली असून आज सकाळी ६ वाजेपर्यंत भाटघर, निरा देवघर वीर व गुंजवणी धरणांच्या पाणलोट क्षेत्रात झालेला पाऊस पुढीलप्रमाणे झालेला पाऊस पुढीलप्रमाणे गुंजवणी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात २४ मि.मी. पाऊस झाला असून धरणात ९९.३८ टक्के पाणी साठा झाला आहे भाटघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात २२ मि.मी. पाऊस झाला असून धरणात १००% पाणी साठा झाला आहे धरणातून ७९३१ क्यूसेकने विसर्ग सुरू आहे नीरा - देवघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात २५ मि.मी. पाऊस झाला आहे धरणात १०० % पाणी साठा झाला असून धरणातून ३३६३ क्यूसेकने विसर्ग सुरू आहे वीर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात २ मि.मी. पाऊस झाला असून धरणात १०० % पाणी साठा झाला असून वीर धरणाच्या सांडव्याद्वारे १५ हजार २६१ क्यूसेक एवढा विसर्ग सुरू आहे चारही धरणात मागील २४ तासात २.२५ टीएमसी एवढ्या पाण्याची आवक झाली आहे