फलटण चौफेर दि ६ सुरवडी ता फलटण गावातील नीरा उजवा कालव्यामध्ये एक सप्टेंबर रोजी चार चाकी गाडी पुलावरून पाण्यात पडली होती यावेळी प्रसंगावधान दाखवत ग्रामपंचायतचे सदस्य नितीन जाधव व अभिजीत खोमणे यांनी जीवाची पर्वा न करता गाडीच्या काचा फोडून दोन महिलांचा जीव वाचवला होता त्यांचा या शौर्याबद्दल त्यांचा जिंती ९ सर्कल येथील दक्षिणमुखी हनुमान मंदिर जन्मोत्सव समितीच्या वतीने शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला यावेळी योगेश माडकर,सागर माडकर ,सचिन माडकर ,विठ्ठल कुदळे, राजेंद्र इमडे, धनाजी माडकर, रविंद्र माडकर,अभिषेक लंभाते, निलेश माडकर,हनुमंत माडकर संतोष कचरे गणपत माडकर बापूराव कचरे अनिल माडकर,योगेश अशोक माडकर,राहुल माडकर, पोपट माडकर, आण्णा माडकर शहाजी गायकवाड, उत्तम जाधव, दत्तात्रय राक्षे, धनंजय जाधव व ग्रामस्थ उपस्थीत होते