फलटण चौफेर दि ६ फलटण व माण तालुक्यासाठी माजी खासदार रणजितसिह नाईक निंबाळकर यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या आरटीओ कार्यालयात आजपासून एमएच ५३ ची सेवा प्रत्यक्ष सुरू झाली असल्याची माहिती फलटण तालुका भाजपा अध्यक्ष अमोल सस्ते यांनी दिली.फलटण व माण तालुक्यातील जनतेला वाहनांच्या विविध कामांसाठी सातारा येथे हेलपाटे मारावे लागत होते. याबाबत माजी खासदार रणजितसिंह ना. निंबाळकर यांनी सातत्याने पाठपुरावा करून फलटण येथे आरटीओ कार्यालय सुरू करुन जनतेची गैरसोय दूर केली. त्यामुळे तालुक्यातील जनतेचे सातारा येथे होणारे हेलपाटे थांबले असून वेळ व पैशाचीही बचत होणार असल्याचे अमोल सस्ते यांनी सांगितले