फलटण चौफेर दि २
सुरवडी ता फलटण गावाच्या हद्दीतुन वाहणाऱ्या नीरा उजवा कालव्यात रविवारी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास एक चार चाकी गाडी रस्त्यावर दिशादर्शक फलक नसल्याने थेट पाण्यात गेली मात्र लगतच उपस्थित असलेल्या स्थानिक युवकांनी घटनास्थळी धाव घेऊन गाडीतून एका महिलेला व युवतीला सुखरूप बाहेर काढल्याने फार मोठा अनर्थ टळला
याबाबत घटनास्थळावरून मिळालेले अधिक माहिती अशी मूळच्या लातूर येथील मात्र सध्या रांजणगाव येथे राहत असलेल्या जयश्री हनुमंत मुंडे व त्यांची मुलगी सुचिता हनुमंत मुंडे मूळ रा कोष्ठगाव ता रेनापूर जि लातूर या एम एच १२ टी व्ही ६१९७ या व्यावसायिक कार मधून चालकासह कर्नाटक येथे देवदर्शनाला गेल्या होत्या परतीच्या प्रवासात मुंडे रांजणगावला माघारी जात असताना सुरवडी गावच्या हद्दीतील नीरा उजवा कालव्यावर आल्यावर या ठिकाणी दिशादर्शक फलक व कालव्याच्या दोन्ही बाजूला गतिरोधक नसल्याने गाडी तीव्र वळणाचा अंदाज न आल्याने थेट कालव्यात गेली पुलाच्या शेजारी असणाऱ्या झाडाच्या पारावर ग्रामपंचायत सदस्य नितीन जाधव व अभिजीत खोमणे हे दोघे बसले होते गाडी पाण्यात पडल्याचा आवाज येतात त्यांनी तात्काळ पुलावर धाव घेऊन गाडीच्या काचा फोडून पाण्यात बुडत असणाऱ्या गाडीतून जयश्री मुंडे व सुचिता मुंडे यांना बाहेर काढले व मोठा अनर्थ टळला या ठिकाणी गतिरोधक व फुलाच्या संरक्षण खांबाची लांबी वाढविण्याची मागणी वारंवार नागरिक व वाहनधारकांमधून होत आहे