Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

साखरवाडीतील बंद असलेली शटल बससेवा सुरू होणार



फलटण चौफेर, दि. ११ : साखरवाडी-लोणंद आणि लोणंद- साखरवाडी या  मार्गावरील बंद असलेली एस. टी.ची शटल बस सेवा आणि सायंकाळी ६ वाजता स्वारगेट-साखरवाडी मुक्कामी बस सेवा पूर्ववत सुरू करण्याबाबत आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या सूचनेनुसार पूर्ववत सुरू होणार असल्याची माहिती आगार व्यवस्थापिका सोफिया शेख व स्थानक प्रमुख राहुल वाघमोडे यांनी दिल्याचे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते शरद जाधव यांनी सांगितले. साखरवाडी बाजारपेठ पुन्हा नव्या जोमाने उभी रहात असून विकासाचा नित्य नवा टप्पा गाठत असल्याने परिसरातून साखरवाडी येथे ग्राहकांची ये-जा वाढत असताना व्यापारी वर्गाला खरेदीसाठी पुणे, फलटण येथे सतत जावे लागत आहे. त्याचप्रमाणे सर्वसामान्य लोकांसह व्यापारी, उद्योजक, अधिकारी, कर्मचाऱ्यांना नियमित प्रवासासाठी एस. टी. बसची आवश्यकता मागणी असल्याचे शरद जाधव यांनी आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी आगार व्यवस्थापक व स्थानक प्रमुख यांच्याशी दूरध्वनीद्वारे चर्चा करुन त्यांना सदर मार्गावर एस. टी. बस सेवा सुरु करण्याची सूचना केली असून त्यांनी सहमती दर्शविली आहे

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.