Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

ध्वनी प्रदूषण नियमांचे उल्लंघन झाल्यास कायदेशीर कारवाई करणार -पो नि सुनील महाडिक

 


फलटण चौफेर (दि ११) 

१७ सप्टेंबर रोजी होणाऱ्या गणपती विसर्जन मिरवणुक तसेच १९ रोजी होणाऱ्या ईद-ए-मिलाद मोहम्मद पैगंबर  जयंती जुलूस मिरवणुकीत ध्वनी प्रदूषण नियमांचे उल्लंघन केल्यास कडक कायदेशीर कारवाई करणार असल्याचा इशारा फलटण ग्रामीण पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी साखरवाडी पोलीस चौकी येथे आयोजित साखरवाडीसह परिसरातील गणेशोत्सव मंडळांचे अध्यक्ष व  साखरवाडीतील मुस्लिम समाज यांच्या झालेल्या संयुक्त बैठकीमध्ये दिला यावेळी साखरवाडी सह परिसरातील छोट्या मोठ्या गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष,उपाध्यक्ष व मुस्लिम समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते

सुनील महाडिक म्हणाले, साखरवाडी परिसरातील गणपती विसर्जन मिरवणूक ही मंडळांनी दिनांक १७ रोजी विसर्जना दिवशीच  पूर्ण करावी दुसऱ्या अथवा  इतर दिवशी विसर्जन मिरवणुकीची परवानगी कोणत्याही मंडळांना मिळणार नसून यावेळी मंडळांनी विसर्जन मिरवणुकीत  डीजेसह मोठमोठ्या साऊंड सिस्टिम व लेझर लाईटचा वापर टाळून  पारंपारिक वाद्यांचा वापर करावा तसेच मंडळाकडून गणेशोत्सव काळात समाज प्रबोधनपर कार्यक्रमांवर भर द्यावा कोणत्याही मंडळाकडून मिरवणुकीमध्ये ध्वनी प्रदूषणकायद्याचे उल्लंघन झाल्यास कडक कारवाई करणार असल्याचे त्यांनी  सांगितले 

  यावेळी पोलीस प्रशासनाकडून मुस्लिम बांधवांना दिनांक १६ रोजी होणाऱ्या ईद-ए-मिलाद (मोहम्मद पैगंबर)  यांच्या जयंतीनिमित्त आयोजित जुलूस मिरवणुक  ही इतर दिवशी घेण्याचे आवाहन करण्यात आले या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद देत  मुस्लिम बांधवांनी दिनांक १६ ऐवजी १९ सप्टेंबर रोजी साखरवाडी मध्ये जुलूस मिरवणूक काढणार असल्याचे  जाहीर केले यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल वायकर, सहाय्यक पो फौ पांडुरंग हजारे, पो हवा महादेव पिसे, अमोल चांगण उपस्थित होते

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.