फलटण चौफेर दि ८
पावसाळ्यामध्ये साथीच्या आजाराने अनेक जण थंडी, ताप, स्वाइन फ्लू, डेंगू मलेरियाने आजारी पडतात, याला कारण प्रत्येकाने आपला परिसर स्वच्छ ठेवला, घराच्या परिसरात पडणारे टायर, बिसलेरीच्या बाटल्या, रिकामे पत्र्याचे डबे, फुटक्या कपबशा, इत्यादी मध्ये पाणी साठून राहिल्याने त्यामध्ये डासांच्या मादी अंडी घालतात, व त्यापासून डासांची निर्मिती होते, साहजिकच साथीचे आजारांनी लोक बळी पडतात, यावर एकमेव उपाय म्हणजे, आपण परिसराची स्वच्छता ठेवणे, असे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी, डॉ. एस. बी. कोंडके यांनी ग्राहक पंचायत महाराष्ट्र राज्य शाखा साखरवाडी, चे अध्यक्ष सोमनाथ मागाडे, व त्यांचे सर्व पदाधिकाऱ्यांना डेंगू, मलेरिया आजाराने साखरवाडी व साखरवाडी परिसरातील अनेक रुग्णांना याची लागण झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर, प्राथमिक आरोग्य केंद्राची संपर्क साधला असता त्यांनी ही माहिती दिली, प्राथमिक आरोग्य केंद्र अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांमार्फत करत असलेल्या, आरोग्य विषयक कामाची माहिती दिली, व ग्राहक पंचायतीने केलेल्या सूचनेची तात्काळ दखल घेऊन त्यांनी गावामध्ये आरोग्य सहाय्यक कर्मचारी श्री, लक्ष्मण वनवे, व आरोग्य सहाय्यक , दत्तात्रय साळुंखे , व महिला आरोग्य सेविकांमार्फत एक संच तयार करून, पिंपळवाडीतील दवाखाना ते संपूर्ण पिंपळवाडी परिसरात घर, घराशेजारीत परिसर, घराबाहेरील पाण्याचे पिंप, अस्ताव्यस्त पडलेले सामान, याची विल्हेवाट लावणे विषयी,व आरोग्याची काळजी घेणे विषयी लोकांना प्रत्यक्ष पाहणी करून माहिती सांगितली,ग्राहक पंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी साखरवाडी परिसरातील दवाखान्यातील डॉक्टर, रक्त तपासणी केंद्र यांच्याशी चर्चा करून या आजाराबाबत माहिती घेतली. व समाज जनजागृती केली.