गोखळी (प्रतिनिधी)सोमवती अमावस्याच्या निमित्ताने फलटण पूर्व भागातील गुणवरे,गोखळी, खटकेवस्ती,गवळीनगर गावच्या ग्रामदैवताना पारंपरिक वाद्यांच्या गजरात धार्मिक विधीपूर्वक निरास्नान घालण्यात आले. गुणवरे येथील ग्रामदैवत श्री भैरवनाथ,गोखळी गावचे ग्रामदैवत दक्षिण मुखी हनुमान,श्री.तुळताभवानी ,श्री खंडोबा, गवळीनगर येथील ग्रामदैवत श्री गवळीबुवा, खटकेवस्ती येथील ग्रामदैवत श्री खंडेराय दैवताच्या सर्व पालख्या ढोल ,ताशा,हलगी पारंपरिक वाद्यांच्या साथीने वाजतगाजत गोखळी गावातील निरानदी काठावरील श्री. खंडेराय मंदिराच्या प्रांगणात आगमन झाल्यानंतर एकत्रितपणे सर्व ग्रामदैवताच्या पुजाऱ्यांनी . मुर्तीना वाजत गाजत निरानदीवर नेमण्यात येऊन दही दुध आणि पंचामृताने धार्मिक विधीपूर्वक निरास्नान घालण्यात आले. गंगा स्नानानंतर खंडोबा मंदिरासमोर सर्व दैवतांच्या आरती झाली आरती ग्राम प्रदक्षिणने सर्व पालख्यांचे आप आपल्या गावांकडे प्रस्थान ठेवले. भाविकांनी ठिकठिकाणी पालखी सोहळ्याचे स्वागत करुन दर्शन घेतले.श्रावण महिन्यातील अखेरच्या सोमवारी सोमवती अमावस्या आल्याने दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती .