Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

कोळकी येथे ग्राहकांसोबत झालेल्या भांडणात परप्रांतीय हॉटेल कामगाराचा खून

 


फलटण चौफेर दि १३

            कोळकी ता फलटण येथे हॉटेल आमंत्रण मध्ये काम करणारा कामगार विपुल उर्फ डॉन मुर्म रा उडीसा याचा काल दि 12 सप्टेंबर रोजी सुमारे दुपारी तीन च्या  सुमारास कोळकी दहीवडी व शिंगणापूर कडे जाणा- या रस्त्याच्या चौकातील पानटपरी चे मालक संशयित अमोल वनारे, वय २८ वर्षे, रा. कोळकी व त्याचा मित्र सलमान रफीक शेख, रा. सोनवडी, ता. फलटण यांच्या बरोबर झालेल्या भांडणात डोक्यात लोखंडी सळई मारल्याने व मारहाण केल्याने उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे फलटण पोलिसांनी सांगितले आहे  संशयित अमोल वनारे व त्याचा मित्र सलमान रफीक शेख हे दोघे  यामाहा मोटर सायकलवर जेवणाचे पार्सल नेण्यासाठी हॉटेल आमंत्रण, कोळकी येथे आले होते. त्यावेळी अमोल वनारे याने जेवणाची ऑर्डर दिली. त्यावेळी  हॉटेल मॅनेजरयांनी रोटी व भाकरी पॅक करण्यासाठी कागद आणण्यासाठी विपूल उर्फ डॉन मुर्म यास सांगीतले. त्यावेळी विपूल उर्फ डॉन मुर्म मॅनेजर यास काहीतरी बोलुन दुर्लक्ष केल्याने, अमोल वनारे याने विपूल उर्फ डॉन मुर्म याच्या डोक्यात टपली मारली. त्यावरुन त्यांच्यामध्ये झटापट झाली. त्यावेळी सलमान रफीक शेख याने सुध्दा विपूल उर्फ डॉन मुर्म यास मारहाण केली. या झटापटीत अमोल वनारे यांने तेथील लोखंडी सळई विपूल उर्फ डॉन मुर्म याच्या डोक्यात व शरीरावर मारहाण केली. त्यामुळे विपूल उर्फ डॉन मुर्म हा गंभीर जखमी झाला  जखमी विपूल उर्फ डॉन मुर्म यास जीवनज्योती हॉस्पीटल, कोळकी येथे दाखल केले. पुढील औषधोपचारासाठी विपूल उर्फ डॉन मुर्म यास ससुन हॉस्पीटल, पुणे येथे नेले असता, त्यास रुग्णालयात दाखल करण्यापुर्वीच तो मयत झाला. सदर माहिती मिळताच मा. पोलीस अधीक्षक  समीर शेख, मा. अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांना माहिती सांगीतली. त्यांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार सपोनि. नितीन शिंदे, पो.उपनिरी. सुरज शिंदे आणि पो.उपनिरी. मृगदीप गायकवाड आणि पोलीस अंमलदारांची तीन पथके बनविली. सपोनि. नितीन शिंदे हे पुणे येथील तपासकामी रवाना झाले. गुन्ह्याचे घटनास्थळ हॉटेल आमंत्रण येथे मा. उपविभागीय पोलीस अधिकारी  राहुल धस यांनी भेट दिली आहे.सदर गुन्ह्यातील दोन्ही संशयीत आरोपींकडे चौकशी सुरु आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.