फलटण चौफेर दि १४
गणेश उत्सव शांततेत पार पडावा या करीता फलटण तालुक्यातील १४ जणांना फलटण ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीमधुन तडीपार करण्यात आले असल्याची माहिती फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी दिली याबाबत फलटण ग्रामीण पोलीस ठाणकातून मिळालेले अधिक माहिती अशी गणेश उत्सव व ईद ए मिलाद सण साजरा होत असल्याने सणाचे कालावधीत फलटण ग्रामीण पोलीस ठाणेचे हद्दीत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवु न देता गणेश उत्सव शांततेत पार पाडावेत या दृष्टीने फलटण ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतील वेळोवेळी गुन्हे करुन सामाजीक स्वास्थ बिघडवणारे, दंगा गोधळ करणारे १४ गुन्हेगार याना तडीपार करण्यात आले असुन पोलीस निरीक्षक सुनिल महाडीक यांनी फलटण ग्रामीण हद्दीतील सराईतांवर प्रांताधिकारी यांच्याकडे प्रस्ताव देण्यात आला होता त्या अनुशंगाने उपविभागीय अधिकारी सचिन ढोले यांनी १४ जणांना तडीपार करण्याचे आदेश दिले आहेत मनोहर संजय जाधव रा साखरवाडी, सागर राजेद्र गायकवाड आसु ता फलटण, आदिनाथ काशिनाथ मोटे सरडे ता फलटण, सचिन बाळु बोडरे रा पिंपळवाडी, खूशवंत लालासो रा विंचुर्णी,सागर युवराज घाडगे रा मलठण, किरण भिमराव घाडगे रा मलठण,अक्षय अंकुश जाधव रा ताथवडे, सुर्यकांत मुगुटराव निंबाळकर,राजाळे, बबन चिंतामणी भिंगारे रा आसु, संतोष नामदेव जगताप रा सुरवडी, अमित्त बाळासो जगताप रा विडणी, विजय बा कांबळे निंभोरे व कुंदा अनिल चौधरी निंभारे यांना १३ सप्टेंबर ते १८ सप्टेंबर या कालावधीत फलटण तालुक्यामध्ये प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आली असल्याचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी सांगितले