फलटण चौफेर दि १३ सुरवडी ता फलटण गावचे सुपुत्र नारायण बबनराव पवार यांना कृषी विस्तार अधिकारी या पदावर पदोन्नती करण्यात आली आहे सातारा जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाच्या वतीने ग्रामसेवकांना पदोन्नती देण्यात आली जिल्ह्यातील ६४ ग्रामविकास अधिकारी व ९ विस्तार अधिकारी म्हणून पदोन्नती देण्यात आली असून सातारा जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात ग्रामपंचायत विभागाच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांच्या प्रमुख उपस्थितीत पदोन्नती प्रक्रिया राबवण्यात आली. यामध्ये नारायण पवार यांचा सुद्धा ग्रामविकास अधिकारी पदावरून कृषी विस्तार अधिकारी या पदावर पदोन्नती देण्यात आली आहे