फलटण चौफेर दि २९
आगामी फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत विद्यमान आमदार दिपक चव्हाण हेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून उमेदवार असल्याची घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री ना अजितदादा पवार यांनी कोरेगाव तालुक्यातील सोळशी येथील विविध विकासकामांच्या लोकार्पण व भूमिपूजन समारंभाप्रसंगी विधान परिषदेचे माजी सभापती आ श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांना दूरध्वनी करून उपस्थित नागरिक व कार्यकर्त्यांना संबोधित केले. त्यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांनी आगामी फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघातून आमदार दीपक चव्हाण हेच पुन्हा उमेदवार असल्याची घोषणा केली