फलटण चौफेर दि ३० सासकल ता फलटण गावातील शेतकरी कुटुंबातील प्रतिक मुळीक यांची नुकतीच भारतीय सैन्य दलात (इंडियन आर्मी) मध्ये निवड झाली. याबद्दल निरगुडी गावातील भैरवनाथ तरुण मंडळाच्या वतीने प्रतिक मुळीक यांचा संविधानाची प्रत व हार देऊन पत्रकार सुरज गोरे,युवक नेतृत्व निलकुमार गोरे, सामाजिक कार्यकर्ते महेंद्र गोरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
शेतकऱ्याचा मुलगा भारतीय सैन्य दलात भरती झाल्यामुळे प्रतिक मुळीक यांच्यावर गावातून तसेच पंचक्रोशीतून अभिनंदनाचा आणि कौतुकाचा वर्षाव होत आहे. आपल्या कुटुंबातील सदस्य भारतीय सैन्यात भरती झाल्यामुळे प्रतिकचे आई- वडील,आजी, काका,काकी,भाऊ, बहिण संपूर्ण कुटुंब आनंदाने भारावून गेले आहेत. यावेळी भैरवनाथ तरुण मंडळाचे अध्यक्ष अजित गोरे, उपाध्यक्ष आदेश गोरे, अनिल गोरे, प्रविण गोरे, आदित्य गोरे, विघ्नेश गोरे आणि मुळीक कुटुंब उपस्थित होते.