फलटण चौफेर दि १२
फलटण ग्रामीण पोलिसांनी शेतीतील पंपाची चोरी करणाऱ्या तिघा जणांच्या टोळीला अटक केली असून दोन दुचाकी व सहा शेतीपंपासह एकूण ४ लाख ४० हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे याबाबत फलटण ग्रामीण पोलीस स्थानकातून मिळालेली अधिक माहिती अशी पोलिसांनी संशयित ओमकार संतोष मदने, रा. १७ फाटा, निंभोरे ता. फलटण, विजय सुखदेव जाधव, रा. सुरवडी, ता. फलटण जि. सातारा, ओमकार शरद लोंढे, रा.सुरवडी, ता. फलटण, जि. सातारा यांना ताब्यात घेतल्यावर त्यानी सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली त्यांचेकडे कौशल्यपुर्ण तपास केल्यावर त्यांनी सुरवडी व फडतरवाडी भागामध्ये शेती पंम्पाची चोरी केली असल्याबाबत कबुली दिली. गुन्ह्यांचा तपास अद्याप सुरु असून अटक संशयतांकडून आणखीन गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली या कारवाईत सुनिल महाडीक यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि. विशाल वायकर, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक जी.बी, बदने, सहा. पोलीस फौजदार हजारे, पोलीस हवालदार नितिन चतुरे, पो. हवा. महादेव पिसे, पोलीस नाईक अमोल जगदाळे, श्रीनाथ कदम, पोलीस कॉस्टेबल हनुमंत दडस, श्रीकांत खरात यांनी भाग घेतला होता.