Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

प्रियांका येळे यांची महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक संचालनालयात नियुक्ती



फलटण चौफेर दि १३

साखरवाडी विद्यालय माध्यमिक विभागाची माजी विद्यार्थिनी साखरवाडी गावची सुकन्या सौ प्रियांका रामचंद्र येळे केसकर यांची महाराष्ट्र शासन क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य  अंतर्गत खेळाडू  भरतीमध्ये थेट नियुक्ती करण्यात आली आहे.  सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेल्या प्रियांका येळे यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण साखरवाडी विद्यालय साखरवाडी या ठिकाणी झाले असून त्यांनी खो खो खेळामध्ये अनेक राष्ट्रीय पुरस्कार मिळवले आहेत भारत सरकारच्या  दर चार वर्षांनी होणाऱ्या  नॅशनल गेम्स २०१५ साली केरळ या ठिकाणी झाल्या होत्या यावेळी खो खो खेळामध्ये सुवर्णपदक मिळाल्याबद्दल महाराष्ट्र शासन क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे या अंतर्गत खेळाडू म्हणून त्यांची भरतीसाठी थेट नियुक्ती करण्यात आली आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.