फलटण चौफेर दि १९
मल्हारपेठ पोलिसांनी टोइंग क्रेन चोरट्याला अटक केली असून त्याच्याताब्यातून सात लाख रुपये किमतीची क्रेन जप्त केली आहे संशयित रविंद्र विठ्ठल चोरगे वय २१ वर्षे, रा. चोरगेवाडी (कुंभारगाव), ता. पाटण याला अटक करण्यात आली असून मल्हार पेठ पोलीस स्थानकातून मिळालेल्या अधिक माहितीनुसार, पेट्रोलींग करत असताना मौजे मरळी ता. पाटण गावचे हद्दीमध्ये ढेबेवाडी जाणारे रोडवर सुतारमळा येथे टोइंग क्रेन क्र.एम.एच.०९ सी.ए.६३०६ ही उभी असल्याचे दिसले असता तेथे जावुन चौकशी केली त्यावेळी त्याच्या हालचाली संशयास्पद दिसलेने त्यास जागीच पकडुन त्याचेकडे चौकशी केली असता तो उडवाउडवीची उत्तरे देत होता. त्यानंतर सदर इसमाकडे अधिक चौकशी करता पोलीस ठाणेस आलेनंतर त्याचे ताब्यातील टोइंग क्रेन नं.एम.एच.०९ सी.ए.६३०६ किंमत अंदाजे सात लाख रुपयेकिमतीची क्रेन कराड शहर येथुन चोरी केली असल्याचे कबुली दिली. सदर टोइंग क्रेन ची कराड शहर पोलीस ठाणे कडुन अधिक माहिती घेतली असता कराड शहर .१९/०९/२०२४ रोजी गुन्हां दाखल झालेचे निष्पन्न झालेने सदर आरोपी व टोइंग क्रेन ही पुढील कारवाई करता कराड शहर पोलीसांचे ताब्यात दिले विजय पाटील पोलीस उपअधिक्षक पाटण विभाग यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मछले , पोलीस उपनिरीक्षक सुनिता शेळके, सहा. फौजदार, प्रदिप साळवी, पो. हवा. संजय मोरे, होम. प्रदिप निकम यांनी केली