Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा यांच्याकडून ८ टन निर्माल्य गोळा

 


फलटण चौफेर दि १७    रेवदंडा ता. अलिबाग जि. रायगड येथील डॉ. श्री . नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्या सौजन्याने फलटण येथे पंढरपुर पूल ( नाना पाटील चौक ) येथे अनंत चतुर्थी दिवशी ८ टन निर्माल्य गोळा करण्यात आले   मंगळवारी दिवसभर निर्माल्य गोळा करण्यात आले  सकाळी ७ वाजल्यापासून रात्री ७ वाजेपर्यत ३०० ते ३५० श्रीसदस्यांमार्फत निर्माल्य गोळा करण्यात आले .पाणी प्रदूषण होवू नये व पर्यावरणाचा समतोल राखला जावा या हेतूने गेल्या ९ वर्षांपासून हा सामाजिक उपक्रम राबविला जातो .निर्माल्यांचे कंपोस्ट खत तयार करून ते खत डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या माध्यमातून लावण्यात आलेल्या झाडांना घालण्यात येणार आहे .  या निर्माल्य उपक्रमाचे फलटण शहरातील नागरिकांमधून कौतुक होत आहे .

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.