फलटण चौफेर दि ३० श्रीमंत सईबाई महाराज महिला सहकारी पतसंस्थेच्या तज्ञ संचालक पदी अँड. सौ वैशाली सुधीर भोसले यांची निवड करण्यात आली श्रीमंत सईबाई महिला पतसंस्थेच्या नुकत्याच झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये वैशाली भोसले यांची तज्ञ संचालक म्हणून निवड करण्यात आली यावेळी संस्थेच्या चेअरमन श्रीमंत शिवांजलीराजे नाईक निंबाळकर यांनी त्यांचे पुष्पहार घालून अभिनंदन केले वार्षिक सर्वसाधारण सभेला विधान परिषदेचे माजी सभापती आ श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर अध्यक्षस्थानी होते तसेच श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर व श्रीमंत अनिकेत राजे नाईक निंबाळकर यांची प्रमुख उपस्थिती होती होळ विकास सोसायटीचे विद्यमान चेअरमन सुधीर कांताराम भोसले यांच्या सौ वैशाली भोसले या सुविद्य पत्नी आहेत त्यांच्या संचालक पदी निवडीने त्यांचे साखरवाडी सह परिसरातून अभिनंदन होत आहे