फलटण चौफेर दि १०
तीन महिन्यापूर्वी लोणंद पोलीस स्थाने हद्दीतील एका गावातून सोळा वर्ष वयाच्या अल्पवयीन मुलीस रात्री.१ वाजण्याच्या सुमारास अज्ञाताने पळवून नेल्याची घटना घडली होती याबाबत लोणंद पोलीसानी ऋषीकेश केशव जमदाडे रा. विठ्ठलवाडी ता. फलटण जि. सातारा या संशयताला सोलापूर येथून ताब्यात घेतले याबाबत लोणंद पोलीस स्थानकातून मिळालेले अधिक माहिती अशी,
गोपनीय बातमीदारामार्फत पोलीस उपनिरीक्षक विशाल कदम यांना अल्पवयीन मुलीस पळवून नेण्याचा प्रकार त्याच गावातील एकाने केला असल्याचे तसेच सदरचे घटनेपासून तो फरार असल्याचे निष्पन्न झाले. आरोपीचे मोबाईल नंबरचे तांत्रीक माहीतीचे आधारे पोलीस उपनिरिक्षक विशाल कदम व त्यांचे मदतनीस पोलीस कॉन्स्टेबल सुनील नामदास यांनी इत्यंभूत माहीती प्राप्त करून घेवून त्याचे विश्लेषनाआधारे संशयित हा तळे हिप्परगा ता. उत्तर सोलापूर जि. सोलापूर येथे राहत असलेबाबत समजले. सदरील गजबजलेले ठिकाण असतानाही तसेच रात्रीची वेळ असतानाही पीएसआय कदम व पोलीस कॉन्स्टेबल सुनील नामदास यांनी बुध्दीकौशल्याने तपास करून पीडीत मुलगी व आरोपी ऋषीकेश केशव जमदाडे रा. विठ्ठलवाडी ता. फलटण जि. सातारा याला मौजे तळे हिप्परगा ता. उत्तर सोलापूर जि. सोलापूर येथून ताबेत घेवून तीन महीण्यांपूर्वीचा अल्पवयीन पीडीताचे अपहरणाचा गुन्हा उघडकीस आणला.याबाबद्दल समीर शेख पोलीस अधिक्षक, वैशाली कडूकर मॅडम अपर पोलीस अधिक्षक, राहुल धस, उपविभागिय पोलीस अधिकारी फलटण यांचे मार्गदर्शनाखाली लोणंद पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सुशील भोसले सहाय्यक पोलीस निरीक्षक, विशाल कदम पोलीस उपनिरीक्षक, पो. हवा. सर्जेराव सुळ , पो.कॉ. सुनील नामदास , पो. कॉ. विठ्ठल काळे यांनी सदर कारवाईत भाग घेतला