फलटण चौफेर दि ५
तडवळे ता फलटण येथील जि.प.प्राथमिक शाळेच्या पालक मिटींगमध्ये शाळेच्या माजी विद्यार्थी व गावातील अंगणवाडी सेविका श्रीमती राजश्री ढोले यांनी शाळेला मदत म्हणून एक महिन्याचे मानधन दिले आहे १५ ऑगस्ट रोजी झालेल्या माजी विद्यार्थी स्नेहमेळाव्यामध्ये आपणाला ज्या शाळेने आपल्याला घडवलं त्याशाळेचं गुरूजनांचं ऋण आपण कधीही फेडु शकत नाही परंतु ज्यावेळी माझ्या शाळेला लोकसहभागाची माजी विद्यार्थांची गरज असेल अशा वेळी त्याशाळेचे ऋण आपण आपलं तन मन धन देऊन फेडले पाहीजेत या उक्तीला अनुसरून शिक्षक दिनी शाळेच्या पालक मिटींग मध्ये श्रीमती.ढोले यांनी १५ऑगस्ट रोजी जाहीर केल्याप्रमाणे आपलं एक महीन्याचं १० हजार रुपयापैकी आज पहिला हप्ता ५ हजार रुपये जमा केला याबाबत त्यांच सर्व स्तरातून कौतुक होत आहे तडवळे गावातील इतर महिलांनी सुद्धा आपल्या मुख्यमंत्री बहीण लाडकी योजनेचे मिळालेले १५०० रुपये या शाळेसाठी देऊ केली असल्याचे यावेळी शाळा प्रशासनातर्फे सांगण्यात आले