Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

वाई पोलिसांकडून १० लाखाचा ४२ किलो गांजाचा साठा जप्त एकास अटक




फलटण चौफेर दि ३० वाई पोलिसांनी तब्बल १० लाख ६२ हजार २५० रुपयांचा ४२ किलो ५००ग्रॅम गांजा जप्त केला असून संशयित ईस्माइल आदिल ईनामदार वय ३१ रा फुलेनगर ता वाई जि सातारा याला ताब्यात घेतले असून याबाबत वाई पोलीस स्थानकातून मिळाल्या अधिक माहितीनुसार,वाई पोलिसांना संशयित  शहाबाग फाटा वाई ता वाई जि सातारा येथे त्याच्या मालकीच्या पत्र्याचे शेडमध्ये चोरुन बेकायदेशीर रित्या गांजाची विक्री करीत आहे. अशी खात्रीशिर बातमी मिळाल्याने गुन्हेप्रकटीकरण पथकासह सदर ठिकाणी जाऊन सापळा रचुन छापा मारला असता  पत्र्याचे शेडचे कसुन झडती घेतली असता, लोखंडी कॉटचे खाली तीन प्लास्टिकची पोती दिसली त्यातुन उग्र वास येत असल्याने ती बाहेर काढुन उघडुन पाहिले असता, त्यामध्ये गांजासदृश्य वनस्पती मिळुन आल्याने सदरचा गांजा हा कशाकरिता आणला आहे याबाबत ईस्माइल ईनामदार याचेकडे विचारणा केली असता, सदरचा गांजा हा चोरुन विक्री करीता आणला असल्याचे त्याने सांगितले सदरचा गांजा हा सुमारे १० लाख ६२ हजार २५० रुपये किंमतीचे ४२.५०० किलोग्रॅम वजन असलेला होता. तो पंचासमक्ष जप्त करण्यात आलेला आहे.

सदरची कारवाई ही मा. पोलीस अधीक्षक साो श्री. समिर शेख, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी साो वाई विभाग श्री. बाळासाहेब भालचिम, सातारा उपविभागीय पोलीस अधिकारी श्री राजीव नवले यांचे मार्गदर्शनाखाली वाई पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी श्री. जितेंद्र शहाणे, सहा. पोलीस निरीक्षक अमोल गवळी, तपासपथकाचे पोलीस उपनिरीक्षक सुधीर वाळुंज, पो. हवा विजय शिर्के, पो. हवा अजित जाधव, पो. कॉ प्रसाद दुदुस्कर, पो. कॉ नितीन कदम, म.पो.कॉ श्वेता गायकवाड पो. कॉ हेमंत शिंदे, पो. कॉ श्रावण राठोड, पो. कॉ विशाल शिंदे, पो. कॉ प्रेमजित शिर्के यांच्या पथकाने केली आहे. पुढील तपास सहा. पोलीस निरीक्षक अमोल गवळी करीत आहेत. मा पोलीस अधिक्षक साो श्री समीर शेख यांनी वाई तपासपथकाचे  अभिनंदन केले

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.